मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पुढील महिन्यात म्हणजे ५ आणि ६ जुलै रोजी असं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे भाजपाने बैठकीतून बहिष्कार टाकत सभात्याग केला.
महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयानंतर भाजपने हल्लाबोल केला आहे. ‘१४ दिवसाचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी ठाकरे सरकारला भीती वाटते,’ अशी टीका माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
‘ठाकरे सरकारला भीती वाटतेय. ४ दिवसाचं अधिवेशन झालं तर हायड्रोजन बॉम्बसारखा स्फोट झाला. ज्या सचिन वाझेची विना फी ची वकिली करत होते. तो सचिन वाझेच यांच्यावर उलटला. त्यामुळे त्यांना असं वाटतं की अधिवेशन जर १४ दिवसाचं झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो,’ असा प्रहार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच, महाविकास आघाडीच्या मतभेदाशी घेणंदेणं नसून जनता नाराज राहता कामा नये ही आमची भूमिका आहे, असं देखील मुनगंटीवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचे हाल का?’; फडणवीस आक्रमक
- अधिवेशन दोन दिवसांच : ‘या पळपुट्या सरकारचा जाहीर निषेध’; भाजप नेत्याची टीका
- ‘सरकार पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ’; देवेंद्र फडणवीसांचं महत्वाचं विधान
- ठाकरे सरकारचं ठरलं ! पावसाळी अधिवेशन दोन दिवसातच उरकणार
- ‘आणखी एकीशी विवाहबद्ध तर दुसरीसोबत…’ ; विजय शिवतारेंवर पत्नीचे गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

