🕒 1 min read
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पुढील महिन्यात म्हणजे ५ आणि ६ जुलै रोजी असं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे भाजपाने बैठकीतून बहिष्कार टाकत सभात्याग केला.
राज्यात चक्रीवादळग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, कोरोना काळातील भ्रष्टाचार, आशा वर्कर्स, धनगर आरक्षण, प्रलंबित नियुक्त्या, एमपीएससी परीक्षा, कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या आकड्यांची लपवाछपवी, परिचारिकांसह कोरोना योद्ध्यांचे मानधन, कायदा सुव्यवस्था, सत्ताधारी पक्षांतील मतभेद आणि त्यामुळे निर्णयांवरून जनतेच्या मनात होणारा संभ्रम असे अनेक महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा आणि सरकारने उत्तर देणं अपेक्षित असताना कोरोनाचं कारण देत अधिवेशन गुंडाळण्याच्या मुद्द्यावरून विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत.
कोरोनाचे कारण पुढे करून माविआ सरकार अधिवेशनापासून पळ काढतय.
मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण,शेतकऱ्यांचे प्रश्न, आशा वर्कर,परिचारिकांचे प्रश्न असे असंख्य प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न समोर असताना २ दिवसीय अधिवेशन घेऊन सरकार काय साध्य करणार?
या पळपुट्या सरकारचा जाहीर निषेध!! pic.twitter.com/IuTHGKaXR6— Prasad Lad (@PrasadLadInd) June 22, 2021
भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी आता महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका केली आहे. ‘कोरोनाचे कारण पुढे करून माविआ सरकार अधिवेशनापासून पळ काढतय. मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण,शेतकऱ्यांचे प्रश्न, आशा वर्कर,परिचारिकांचे प्रश्न असे असंख्य प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न समोर असताना २ दिवसीय अधिवेशन घेऊन सरकार काय साध्य करणार? या पळपुट्या सरकारचा जाहीर निषेध!,’ असं भाष्य प्रसाद लाड यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचे हाल का?’; फडणवीस आक्रमक
- ‘पवारांच्या पे रोलवर राहून बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’
- ‘सरकार पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ’; देवेंद्र फडणवीसांचं महत्वाचं विधान
- ठाकरे सरकारचं ठरलं ! पावसाळी अधिवेशन दोन दिवसातच उरकणार
- ज्या राष्ट्र मंचाच्या बॅनरखाली पवारांच्या निवासस्थानी बैठक होत आहे तो नेमका तरी काय आहे?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

