🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वादातून त्रस्त असल्याची माहिती मिळत आहे. विजय शिवतारे यांचा मोठा मुलगा विनय शिवतारे त्यांच्या फेसबुक खात्यावरून गेल्या अनेक दिवांपासून विजय शिवतारेंबाबत काही वादग्रस्त पोस्ट करत होता. परंतु त्यावर त्याचे खाते हॅक झाले असल्याचे स्पष्टीकरण विजय शिवतारे देत होते. परंतु आता हे खाते त्यांचा मुलगा विनय हाच चालवत असून त्यांनी हा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आणल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान या कौटुंबिक कलहातून ते गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक त्रासाला सामोरे जात असल्याची माहिती त्यांची मुलगी ममता शिवदीप लांडे-शिवतारे यांनी दिली. याच त्रासामुळे त्यांना आज हृदयविकाराचा झटका आला. विजय शिवतारे यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला होता. मुलगी ममता लांडे-शिवतारे यांनी त्यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पहाटे 2 वाजता दाखल केले. यावेळी ममता लांडे यांनी हॉस्पिटलमधूनच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपले भाऊ विनय शिवतारे व विनस शिवतारे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे.
दरम्यान आता विजय शिवतारे यांच्या कन्येने आई-भावांवर आरोप केल्यानंतर विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या 27 वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त असून पहिली पाच वर्ष एका महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहत आहेत, असा दावा मंदाकिनी यांनी मुलगा विनय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन लाईव्ह येत केला आहे.
https://www.facebook.com/vinay.shivtare/videos/4748952378464434/
यावेळी त्या म्हणाल्या कि, ‘मुलगी ममता यांनी मुलगा विनय आणि विनस यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. वास्तविक गेल्या 27 वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त राहत होते. त्यातील पहिली पाच वर्ष उज्ज्वला बागवे नावाच्या महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत मीनाक्षी पटेल यांच्यासोबत पवईस राहत आहेत. संपत्ती हा वादाचा विषय नाही, विजय शिवतारेंच्या मानसिक जाचातून सुटका करुन घेणे, हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे,’ असा दावा मंदाकिनी शिवतारे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अधिवेशन दोन दिवसांच : ‘या पळपुट्या सरकारचा जाहीर निषेध’; भाजप नेत्याची टीका
- ‘पवारांच्या पे रोलवर राहून बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’
- ‘सरकार पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ’; देवेंद्र फडणवीसांचं महत्वाचं विधान
- ठाकरे सरकारचं ठरलं ! पावसाळी अधिवेशन दोन दिवसातच उरकणार
- ज्या राष्ट्र मंचाच्या बॅनरखाली पवारांच्या निवासस्थानी बैठक होत आहे तो नेमका तरी काय आहे?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

