Share

एक नवीनच कार्यपद्धत संजय राऊत यांनी विकसित केली, सुधीर मुनगंटीवारांची सडकून टीका

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अडकलेल्या मजूरांना गावी जाण्यासाठी मदत करणारा अभिनेता सोनू सूद याच्या कामाची प्रचंड चर्चा सुरु आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोनू सूदच्या एकूण कार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सामनातील ‘रोखठोक’ या सदरात संजय राऊत यांनी सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या लेखात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यात पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारने काहीच केले नाही. यानंतर राज्यपालांनी त्याला थेट राजभवनावर बोलावून त्याचे कौतुक केले. महाराष्ट्रातील अनेक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि बँक कर्मचारी जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचे कधी कौतुक झाले नाही. हा सगळा घटनाक्रम संशय निर्माण करणारा असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

काल दिवसभर राज्याचे राजकारण सोनू सूद वरून तापलं असताना रात्री उशिरा अभिनेता सोनू सूद याने मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत अस सोनू सूद यांने स्पष्ट केलं आहे.

यावर आता भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आधी सामना दैनिकात उत्तम सेवा कार्य करणाऱ्या सोनू सूद विरोधी अग्रलेख लिहायचा, मग त्यांना मातोश्रीवर भेटीसाठी घेऊन जायचं आणि नंतर स्वतः ट्विट करायचं अशा नवी कार्यपद्धत संजय राऊत यांनी विकसित केल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच याबाबतचा खुलासा त्यांनाच विचारायला हवा, असं ते म्हणाले.

“सोनू सूद यांच्या मातोश्री भेटीविषयी त्यांची रणनीती आणि नियोजन याबाबतचे उत्तर भेटीसाठी त्यांना घेऊन जाणारेच देतील. उत्तम काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. यात राजकारण करणे योग्य नाही. देशाने नेहमीच सेवेची किंमत केली आहे. सेवेबद्दल शंका उपस्थित करु नका. हे चांगल्या राजकारणाचे लक्षण नाही. संजय राऊत यांनी नवी पद्धत विकसित केली आहे. आधी विरोधी अग्रलेख लिहायचा, मग भेट घालून द्यायची आणि नंतर स्वतः ट्विट करायचे ही त्यांची पद्धत आहे. याबाबतची माहिती स्वतः संजय राऊतच देतील.” अस सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

…. म्हणून चक्क देवेंद्र फडणवीसांनी मानले शिवसेनेचे आभार

दरम्यान, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच आहे. असं असलं तरी सोनू सूद यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर एक चांगलं काम केलं. त्याचं कौतुक झालं पाहिजे. अस देवेंद्र फडणवीस म्हणाले आहते.

तर, आमचं सरकार राज्यात जलयुक्त शिवारचं काम करत असताना नाम फाऊंडेशन आणि आमीर खानची पाणी फाऊंडेशनही समांतर काम करत होती. पण आम्ही हेवेदावे ठेवले नाहीत. ते एकप्रकारे सरकारला मदत करत होते. त्यामुळं त्यांना मदत कशी करता येईल हेच आम्ही पाहिलं,’ असं फडणवीस म्हणाले. ‘जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे. अशा बाबतीत राजकारण करणं पूर्णपणे चुकीचं आहे,’ असंही फडणवीस म्हणाले.

विधानपरिषद निवडणूक : उद्या होणार महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर शिक्कमोर्तब ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!