मुंबई : सोनू सूद देवदूत वगैरे नाही. हा निव्वळ माध्यमं आणि पीआर एजन्सीजचा खेळ आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते, अशी टीका संजय राऊत यांनी सामनातील ‘रोखठोक’मधून केली आहे. या वादावर काल सोनूने मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने पडदा पडला आहे.
‘ग्रामपंचायतीच्या बाबतीत ‘तो’ निर्णय आम्हाला नाईलाजास्तव घ्यावा लागला’
मात्र इकडे संजय राऊत यांनी सोनू सूदवर टीका करताना अप्रत्यक्षपणे भाजपाशी संबंध जोडल्यानंतर आता याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच चिमटे काढले आहेत. शिवसेनेच्या केलेल्या टीकेबाबत आभार मानत फडणवीसांनी, ‘चांगली कामं करणारे भाजपामध्येच आहेत असा शिवसेनेचा ठाम विश्वास दिसतो’ असा चिमटा काढला.
नेमकं काय म्हणाले फडणवीस ?
‘कोणीही चांगलं काम केलं तर त्या कामाचं कौतुक झालं पाहिजे. सोनू सूद यांनी चांगलं काम केल्याबरोबर ते भाजपाचे आहेत, असं सांगितलं गेलं. शिवसेनेचा ठाम विश्वास दिसतो की चांगलं काम करणारे हे भाजपामध्येच आहेत. आम्हाला याचा आनंद आहे आणि त्यांचा आभारी आहे. पण सोनू सूद यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये म्हणून सांगतो, त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर एक चांगलं समाजकार्य केलं आहे. त्या कामाचं कौतुक झालं पाहिजे.
१० लाख ७८ हजार १२१ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री
‘आम्ही जेव्हा जलायुक्त शिवारचं काम करायचो तेव्हा नाम संस्था आणि आमीर खान मदत करायचे. आम्ही हेवादावा केला नाही. ते सरकारला मदतच करत होते. त्यांचं आम्ही कौतुकच केलं. जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे आणि त्यांना मदतही केली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. अशा बाबतीत राजकारण करणे हे चुकीचे आहे’.

