Share

शिवसेनेच्या सत्तेला सोडण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही – सुधीर मुनगंटीवार

Published On: 

चंद्रपूर : ‘समाना’ अग्रलेखात काँग्रेसला ज्या काही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सूचना केल्या आहेत त्या सूचना काँग्रेसने समजून घेतल्या पाहिजेत. काँग्रेस फार अडजस्टमेंट करणारा पक्ष आहे. तुम्ही त्यांना राज्यसभेत जागा द्या किंवा नका देऊ, विधानसभेत जागा द्या किंवा नका देऊ. काँग्रेस शिवसेनेनेला कितीही धमक्या देत असेल तरी शिवसेनेच्या सत्तेला सोडण्याची क्षमता ही काँग्रेसमध्ये असू शकत नाही”, असा चिमटा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कॉंग्रेसला काढला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर निशाणा साधण्यात आला. त्याचबरोबर ‘शिवसेनेचा त्याग मोलाचा आहे हे विसरता येणार नाही’, असंही अग्रलेखात म्हटलं आहे. याच गोष्टीचा धागा पकडत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

माझी सध्या मुंबईत यायची हिंमत नाही – नितीन गडकरी

दरम्यान, ‘शिवसेनेचा त्याग खूप मोठा आहे. शिवसेनेने 30 वर्षांचा जुना मित्र सोडला, हा किती मोठा त्याग आहे. शिवसेनेला पदाचा मोह नाही, हे खरं आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली, असं म्हणणं योग्य नाही. शिवसेनेने भाजपची साथ सोडली कारण त्यांनी ‘मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन’, असं वचन दिलं होतं. हे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी भाजपच्या मैत्रीचा त्याग केला’, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला देखील लगावला आहे.

तर, “काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा त्यांना अनुभव आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते आणि सत्ता कोणाला नको, असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रीपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये” अशा शब्दात काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर सामना’च्या भाष्य अग्रलेखात करण्यात आले आहे.

मंत्री घरात, जनता रस्त्यावर ; भाजप नेत्याची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!