पालघर : राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के एवढा झाला आहे. राज्यात मंगळवारी ( १६ जून ) १८०२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ५७ हजार ८५१ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी ( १६ जून ) कोरोनाच्या २७०१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५० हजार ४४ रुग्णांवर (ॲक्टिव) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मात्र आता राज्यात कोरोनाचा कहर वाढतच असताना भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लबोल करत उपाययोजना करण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप केला आहे. राज्य सरकारने उपाययोजनांच्या दृष्टीने पावले उचलायला हवी होती. मुंबईत मुख्यमंत्री व उपनगरचे पालकमंत्री घरातच आहेत. मंत्री घरात व जनता रस्त्यावर असा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी केला आहे.
दरम्यान, जीएसटीची सर्व रक्कम केंद्राकडे जमा होते. त्यातून राज्य सरकारला येणारी रक्कम दिली जात नसल्याचा केंद्र सरकारवरील आरोप खोडून काढीत आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे नेहमीच बोट दाखवीत असल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
‘जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांनीच महाराष्ट्र घडला, यापुढेही घडत राहील’ – अजित पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत चांगली कामगिरी करताना कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना, आदीसह अनेक समस्या सोडविणारे एतिहासिक निर्णय घेतले. वर्षभरातील यशस्वी वर्षपूर्तीच्या माध्यमातून भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. भातखळकर यांनी पालघरच्या विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, माजी आमदार पास्कल धनारे, उपजिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, युवाध्यक्ष समीर पाटील आदी उपस्थित होते.
भारत-चीन तणाव : चीनच्या उलट्या बोंबा, वाचा काय म्हटलंय चीनने ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

