मुंबई : शिवसेना खासदार आणि ”सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ‘अनलॉक मुलाखत’ या मथळ्याखाली ही संपूर्ण मुलाखत दोन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित होत आहे. उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीमध्ये दिली आहेत. अगदी लॉकडाउनच्या कालावधीपासून ते त्यांच्यावर होणाऱ्या टीकेसंदर्भातही मुख्यंत्र्यांनी आपली रोकठोक मते मांडली आहेत. तर हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेली ही टोलेबाजी भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी त्याला ‘हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा’ हा फिल्मी डायलॉग असल्याचं प्रत्त्युत्तर दिलं.
‘हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा’ हा फिल्मी डायलॉग आहे. त्यांचं हे विधान इतरांना उद्देशून नसून स्वतः उद्धव ठाकरे यांना उद्देशून आहे. ज्या दिवशी वाटेल त्यादिवशी ही हिंमत त्यांच्याच कामी येणार आहे. हे वाक्य म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मनातील ‘द्वंद्व’ आहे. 30 वर्ष जुन्या मित्राला बाजूला सारत वैचारिक मेळ नसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने ही हिंमत त्यांच्या कामात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला सतत कडवा विरोध केला आणि म्हणून त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे बसले असल्याने हे बळ त्यांच्याच कामी येवो अशा शुभेच्छा. सरकार बाहेरच्या कुठल्याही माणसांनी पडत नाही. मध्यप्रदेश आणि राजस्थान त्याची उदाहरणं आहेत’. अस सुधीर मुनगंटीवर म्हणाले आहेत.
सिंधिया यांचा फोटो पोस्ट करत कॉंग्रेस नेत्याने दिल्या नागपंचमीच्या शुभेच्छा
तर, 30 वर्ष जुन्या शिवसेनेसारख्या मित्राला आणि त्यांच्या नेतृत्वाला कमी लेखण्याची भाजपची कधीच भूमिका नव्हती. मात्र उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले असेल तर इतरांना पोटदुखी का होईल? उद्धव ठाकरे मित्र आहेतच त्यांनी जनादेशाचा अवमान केला म्हणून त्यांचे महत्त्व आम्ही कमी करणार नाही. त्यांच्या हातून उत्तम काम व्हावे अशी सदिच्छा. केवळ ठाकरेच नव्हे, तर राज्यात कोरोना काळात काम करणारा प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचे काम करत आहे. सरकारच्या कामकाजातील उणिवा सांगणे म्हणजे कमी लेखणे नव्हे”, असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.
अजित पवार हेडमास्तर आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावं – चंद्रकांत पाटील


