पुणे : काही ठिकाणी अजित पवार मुख्यमंत्री, तर काही ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. अजित पवार हेडमास्तर आहेत, म्हणून उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडून काहीतरी शिकावं. असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. चंद्रकांत पाटलांनी आज पुणे महानगरपालिकेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधलं आहे.
तिघे एकत्र येऊन लढा, भाजप त्याला घाबरत नाही आणि हे एकदा होऊन जाऊद्या. सरकारमध्ये ज्या कुरबुरी सुरु आहेत, त्या फक्त स्वतःच्या ताटात काहीतरी पाडून घेण्यासाठी सुरु आहेत”,असं म्हणत राज्यातील पुढील निवडणुका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढवण्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर चंद्रकांत पाटलांही थेट महाविकास आघाडीला आव्हान दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात, ते स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत – राधाकृष्ण विखे
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे पालिकेत भेट देत महापौर आणि पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत कोरोनाचा आढावा घेतला. महापौरांच्या दालनात ही बैठक पार पडली. या बैठकीला महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष उपस्थित होते.
मराठा आरक्षण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळ उपसमितीसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा


