Share

शिवसेनेला पदाचा मोह नाही, वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी आमची साथ सोडली – सुधीर मुनगंटीवार

Published On: 

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर निशाणा साधण्यात आला. त्याचबरोबर ‘शिवसेनेचा त्याग मोलाचा आहे हे विसरता येणार नाही’, असंही अग्रलेखात म्हटलं आहे. याच गोष्टीचा धागा पकडत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

‘शिवसेनेचा त्याग खूप मोठा आहे. शिवसेनेने 30 वर्षांचा जुना मित्र सोडला, हा किती मोठा त्याग आहे. शिवसेनेला पदाचा मोह नाही, हे खरं आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली, असं म्हणणं योग्य नाही. शिवसेनेने भाजपची साथ सोडली कारण त्यांनी ‘मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन’, असं वचन दिलं होतं. हे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी भाजपच्या मैत्रीचा त्याग केला’, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

मंत्री घरात, जनता रस्त्यावर ; भाजप नेत्याची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

दरम्यान, “काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा त्यांना अनुभव आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते आणि सत्ता कोणाला नको, असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रीपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये” अशा शब्दात काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर सामना’च्या भाष्य अग्रलेखात करण्यात आले आहे.

पुण्यात अजितदादांचीच ‘दादागिरी’, भाजपच्या ‘त्या’ निर्णयाला केराची टोपली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!