टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकी दरम्यान राज्यात भाजप आणि मनसे या पक्षांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध पाहिला मिळाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे म्हणत भाजप सरकारचे वाभाडे काढले होते. तर त्यांना प्रत्युत्तर देताना अनेक भाजप नेत्यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवली होती.तर आता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा राज ठाकरे यांना डिवचले आहे.
मनसे हा दुर्मिळ प्रजातीचा पक्ष बनला आहे, निवडणूक लढवायची नाही, राजकारणात प्रत्यक्ष भाग घ्यायचा नाही. फक्त टीका करत राहायचं हीच मनसेची ओळख बनली आहे, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना फटकारले आहे. तर वैयक्तिक जहरी टीका करण्यापेक्षा देशाच्या विकासासाठी बोललात तर बरं राहील, असा सल्लाही त्यांनी राज ठाकरेंना दिला आहे.


