Share

आघाडीला खिंडार : ‘या’ बड्या नेत्याने बांधले हाती शिवबंधन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणाच्या सारीपाटावर शह काटशह चं राजकारण सुरु झालं आहे. कधी कोण कोणाच्या गळ्याला लागेल आणि कोण कोणाची साथ सोडेल याचा काही नेम नाही.

याच पार्श्वभूमीवर आघाडीला अजून एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर फराटे यांनी हाती शिवबंधन बांधले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.

सुधीर फराटे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिरूर तालुक्यातील पूर्व भागात शिवसेनेची ताकद वाढली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांचे निकटवर्तीय म्हणून सुधीर फराटे ओळखले जायचे.

दरम्यान, सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अनेक आमदारांनी भाजपचा रस्ता धरल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली असताना सत्ताधाऱ्यानी राष्ट्रवादीच्या दिग्गज आमदारांना आपल्या पक्षात सामील करून घेतल्याने राष्ट्रवादी पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

‘भाजपला ‘एक देश – एक निवडणूक’ नव्हे तर ‘ एक देश- एक पक्ष’ हवाय’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलूख मैदानी तोफा गुरुवारी ‘किल्लारी’त धडाडणार

मुख्यमंत्री पद घेणारचं… सोडतो की काय ? चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवली सुप्त इच्छा

मला ‘ईडी’च्या चौकशीचा काहीही फरक पडत नाही, राज ठाकरे आक्रमक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!