टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळवून देण्याची मोठी जबाबदारी प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर आहे. तसेच भाजप सेनेचं सरकार आल तर मुख्यमंत्री होयला आवडेल का असा प्रश्न पाटील यांना वारंवार विचारला जात आहे. यावर प्रश्नावर पाटील देखील पत्रकारांची फिरकी घेत आहेत. पुण्यात असाच प्रश्न पाटील यांना विचाराला होता. यावर हो घेणारचं… सोडतो की काय ? असे म्हणत उत्तर दिले.
पुण्यात आज चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी वार्तालाभ केला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे. पक्ष देईल ते काम करायला आवडेल. पुण्यातील कसबा काय तर गडचिरोलीत जाऊन पण लढायची पण तयारी आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी निभावेन. पक्षाने मुख्यमंत्रीपद दिले तर का सोडायचं असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.
दरम्यान चंद्रकांत पाटील येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष रिंगणात उतरणार आहेत. तर पुण्याच्या कसबा या मतदार संघातून ते निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. गिरीश बापट यांच्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट करणार आहेत, अशी चर्चा होती. तसेच महापौर मुक्ता टिळक, हेमंत रासने, धीरज घाटे आणि गणेश बीडकर हे नेते देखील कसबा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या येण्यान या इच्छुक आणि चर्चेतल्या नेत्यांचा पत्ता कट होणार असल्याच दिसत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

