Share

‘महाराष्ट्र बंदचे नाटक बंद करा आणि ताबडतोब शेतकऱ्यांना मदत जाहीर करा’

Published On: 

मुंबई – उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. मुंबईत काल मध्यरात्रीपासून आठ बसची तोडफोड झाली आहे. ठाण्यात बस बंद आहेत. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समिती, तसंच दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत. महाविकास आघाडीतील नेते हे रस्त्यावर उतरून बंद मध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आणि व्यापारी वर्गाला आवाहन करत आहेत.

दरम्यान, अनेक ठिकाणी लोकांनी आणि व्यापाऱ्यांनी या बंदला विरोध केल्याचे देखील दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दुकाने बंद असली तरीही व्यापार सुरूच असल्याचे देखील दिसून आले आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदच्या मुद्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका टिपण्णी करताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहेत.

भाजप नेते  सुधाकर भालेराव यांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे . ते म्हणाले, महाराष्ट्रातील महावसुली आघाडी ठाकरे सरकारची उत्तर प्रदेश येथील घटना समोर करून  महाराष्ट्र  बंद ची  भूमिका  म्हणजे तीनही पक्षातील घोटाळ्यात  छापे मारीत अडकलेल्या घटनेला बगल  देण्यासाठी राज्यातील जनतेच्या डोळ्यात एक प्रकारची धूळफेकच होय… परंतू याद  राखा महाराष्ट्रातील जनता खूप हुशार आहे .तीन पक्षाची अभद्र युती करून ठाकरे सरकार मधील घोटाळ्याच्या मालिका उघड होत आहेत म्हणून दुसऱ्या राज्यातील घटनेला समोर करून आपल्याच राज्यातील जनतेला वेठीस धरत असाल तर एक दिवस आपणाला राज्यातून हिच जनता माय बाप हद्दपार केल्याशिवाय रहाणार नाही हेही लक्षात घ्या.

ते म्हणाले, उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी हे एक संन्याशी निष्कलंक चारित्र्य संपन्न निर्भीड पोलादी पुरुष विकास रत्न म्हणून लाभलेले मुख्यमंत्री आहेत .आणि ते कोणत्याही घटनेला निःपक्षपाती न्याय मिळवून देण्यासाठी खंबीर आहेत.म्हणून आपल्या सारख्या अभद्र युतीच्या विचारांची महाराष्ट्र बंदची घोषणा जनतेला अडचणीत आणून दिशाभूल करण्याची एक राजकीय खेळीच आहे. त्यापेक्षा अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यांना मदतीची गरज आहे तात्काळ सरसकट प्रति हेक्टरी 50 हजार मदत जाहीर करा नाहीतर खुर्च्या खाली करा .

उत्तर प्रदेश येथील मुख्यमंत्री मा आदित्यनाथ योगीजी सक्षम आहेत हि महाराष्टातील जनता जाणून आहे आपण डुप्लिकेट पुळका दाखवण्याची गरज नाही हे लक्षात घ्यावे. परंतू महावसुली आघाडी ठाकरे सरकार महाराष्ट्र बंद करून आपले पाप छापे मारी घोटाळे निष्क्रियता दडवून ठेवण्यासाठी राज्यातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून दिशाभूल करत आहे असले महाराष्ट्र बंदचे नाटक बंद करा शेतकऱ्यांना मदत जाहीर करा ….!!!!तसेच ठाकरे सरकारमध्ये दलितांवर अन्याय अत्याचार बलात्कार खून यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यावर आळा घाला . नाहीतर रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!