औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार पोलीस ठाणा आवारात जि.प.बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या विशेष प्रयत्नातुन पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून त्याचे लोकार्पण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी औरंगाबाद परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, प्रभारी अधीक्षक सुनील लांजेवार, जि.प.बांधकाम सभापती किशोर बलांडे, जि.प.सदस्य शिवाजी पाथ्रीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल, स.पो.नि आरती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व अतिथींना वडोदबाजार पोलीसांनी सलामी दिली, त्या नंतर पेव्हर ब्लॉकचे लोकार्पण झाले.
वडोदबाजार पोलीस ठाणे स्थलांतरित झाल्यापासून येथील नागरीक हे पोलीस ठाणे गावातच असावे यासाठी लढा देत आहे. परंतु आता जे झाले त्यात काही बदल करता येणार नाही. परंतु बलांडे यांनी मांडलेली मागणी योग्य आहे. मी पोलीस प्रशासनाला सुचना देतो की लगेच वडोदबाजार गावात पोलीस वसाहत व चौकी चा प्रस्ताव तयार करा, या साठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देतो असे सांगितले. यावेळी सरपंच शिवाजी खरात, गजानन ईधाटे, श्यामराव साळूंके, अमोल डकले, रामदास काकडे, दत्तु करपे, सोमनाथ करपे, कचरु साबळे, पुंजाराम तांबे, सोनाजी साबळे, अनिल देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रेट भेट! सलमानने शेअर केले मीराबाईसोबतच्या भेटीचे फोटो
- निराशादायक! इस्त्रोची जीएसएलव्ही- एफ १० उपग्रह मोहीम अपयशी
- आयपीएल तयारीसाठी माही चेन्नईच्या कॅम्पमध्ये दाखल, व्हिडीओ व्हायरल
- ऐतिहासिक महेमूद दरवाजा लगतच्या अतिक्रमण धारकांना २४ तासांची मुदत
- मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं ; राज्यातील हॉटेल्स, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

