🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – विधानसभेची मुदत संपण्याला अवघे ३ दिवस उरले असतानाही राज्यात निर्माण झालेला सत्तापेच कायम आहे. शिवसेने प्रस्ताव द्यावा, मु्ख्यमंत्रिपदाबाबात भारतीय जनता पक्षाची तयारी आहे, असे भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आले असले तरी देखील भाजपच्या हे म्हणणे शिवसेनेने फेटाळून लावले आहे. भारतीय जनता पक्षाला आता कोणताही प्रस्ताव दिला जाणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याचे शिवसेनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
सत्तासंघर्षाच्या या युद्धात आता संघाने उडी घेतली आहे.राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्याची जबाबदारी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर, सूत्रांची माहिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही जबाबदारी गडकरींवर सोपवली आहे.
शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास जास्त काळ सरकार टिकणार नाही, राष्ट्रपती शासन लागेल असं संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांनी व्यक्त केले आहे. भाजपनं मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडू नये, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास काही दिवसांत पुन्हा निवडणुका होतील असं भाकीत वैद्य यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी बोट ठेवलं आहे. “भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने मार्ग शोधावा ही माझी विनंती आहे. भाजपातील अनेक नेत्यांना शिवसेनेबाबत तक्रारी आहेत, तितक्याच तक्रारी शिवसेनेच्याही भाजपातील नेत्यांविषयी आहेत हे खरं आहे. पण हिंदुत्ववादी पक्षांना एकत्र येण्यासाठी संयमाची गरज आहे, किमान आणखी एक दशक हे सहन केलेलं कधीही चांगलं आहे”, असं ट्वीट सुब्रमण्यम स्वामींनी केलं.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1191961846586195968?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191966552884727809?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
