नागपूर – कोरोनामुळे बाधित रुग्णांची संख्या व मृत्यूदर वाढत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांवर तात्काळ उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर करा, यासाठी स्वतःही पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे केले.
सप्टेंबरच्या मध्यात मृत्यू दर वाढला होता. आता तो कमी होत आहे. मात्र तरीही ही चिंतेची बाब आहे. मृत्यू दर का वाढला याचा आढावा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला.
हैद्राबाद हाऊस येथे झालेल्या बैठकीत त्यांनी विदर्भाच्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी असणाऱ्या मेयो, मेडिकल व एम्स यंत्रणेला बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. सोबतच सर्व धर्मदाय इस्पितळाना कोविड उपचार यंत्रणेमध्ये सक्रिय करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या काळात चॅरिटी हॉस्पिटलनी नागरिकांसाठी कोरोना उपचारा करिता स्वतःहून पुढे येण्याची अपेक्षा आहे. यात मागे राहिलेल्या हॉस्पिटलला गतिशील करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला आमदार विकास ठाकरे, आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनपा अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा,अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डि.एस.सेलोकर,अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गडेकर, अतुल लोंढे व आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी नागपूरमधील मृत्युदर का वाढला याची कारणे जाणून घेतली.अशावेळी धर्मदाय हॉस्पिटल काय करतायेत? असा प्रश्न उपस्थित करीत, गेल्या सहा महिन्यात कोरोना संदर्भात या रुग्णालयांनी गरीबांच्या सेवेसाठी काय केले या बद्दलचा अहवाल सादर करण्याचे निर्देशित केले. तसेच यापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या निर्देशांची कुठपर्यंत पूर्तता झाली. त्याबाबतचा आढावा घेतला.
नागपूरमध्ये सर्वसामान्य माणसाला आरोग्य यंत्रणेने बाबतची अद्ययावत माहिती नाही, असे होता कामा नये. सामान्यातल्या सामान्य माणसाला शासकीय व खाजगी हॉस्पिटलमधील बेडची उपलब्धता सहज माहिती पडेल, अशी यंत्रणा लोकाभिमुख करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या :-
- महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसाठी पवार सरसावले; अनिवासीय मराठी भारतीयांसोबत साधला संवाद
- मुंबई पोलिसांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर आरोप करणारे आता तोंडघशी पडले’
- सुशांतसिंग प्रकरणात भाजपाचे षडयंत्र उघड; एसआयटी चौकशीची काँग्रेस मागणी
- मिशन बिगिन अगेन : रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत कार्यप्रणाली जाहीर
- लोकजनशक्ती पार्टी संस्थापक रामविलास पासवान यांची प्रकृती आणखी खालावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

