टीम महाराष्ट्र देशा : दक्षिण सोलापूर तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील तलाव उजनीच्या पाण्याने भरून घेण्याच्या सूचना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले असून, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण मंडळ अधीक्षक अभियंता तथा प्रशासक यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीतामाई, निंबर्गी, विंचूर, वडापूर, मंद्रूप, गुंजेगाव, होटगी, धुबधुबी तलाव इंगळगी, तसेच जिल्ह्यातील हिप्परगा, एखरूक, वडाळा -गावडी दारफळ, आष्टी, पोखरापूर, बिबिदारफळ येथील तलाव भरून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील धरण परिसरात संततधारा पाऊस सुरु असल्याने उजनीत मोठ्या प्रमाणात विसर्ग येत आहे. पाण्याचा उपयोग पाणी टंचाई भागातील तलावात सोडल्याने अनेक गाव परिसरातील शेतकरी सुखावेल, पाण्याची तहान भागली जाईल या उद्देशाने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत उजनी धरणातून कॅनॉल फिडींग द्वारे सोडण्यात आलेल्या पाण्यातून तात्काळ भरून घेण्याच्या सूचना दिल्या.
सदर सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. विंचूर, गुंजेगाव कुरुल शाखेवरील आवर्तन चालू केले असून, बेगमपुर शाखा कालव्यातून वडापूर गाव तलावात पाणी सोडले आहे, शिरापूर उपसा सिंचन योजनेतून बीबीदारफळ साठवण तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे व वडाळा गावडी-दारफळ तलावात पाणी सोडण्यात आले असून, येत्या आठ दिवसात निंबर्गी तलावात देखील पाणी सोडण्यात येणार आहे.
आष्टी उपसा सिंचन, कारंबा शाखेचे, कुरुल शाखा कालवा, भूमिगत पाईप लाईन जोडणे अशा तांत्रिक बाबींची कामे प्रगतीपथावर असल्यामुळे सीतामाई, मंद्रूप गाव तलाव, धुबधुबी तलाव, पोखरापूर, होटगी, एखरूक तलाव भरण्यासाठी विलंब लागणार आहे. अन्य तलाव तात्काळ भरून घेण्यात येत आहेत. भीमा सीना जोडकालवा प्रकल्प, सिमेंट कम बंधारा, जलयुक्त शिवार अशा विविध उपक्रमांतून येत्या काळात दक्षिण सोलापूर मतदारसंघासोबतच, जिल्ह्यात ४०% सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
पाचपुते सोडून मी दुसऱ्याची शिफारस करेलच कशी ? – सुजय विखे
आरक्षणावरून राज्य सरकार बनवाबनवी करतंय : अजित पवार
इमरान खान आणि नरेंद्र मोदी एकाच आईची मुले : कॉंग्रेस


