Share

सुभाषबापूंनी साधला पुणेरी सोलापूरकरांशी संवाद, सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे मदतीचे आश्‍वासन

Published On: 

सोलापूर : पुणे येथील वास्तव्यास असलेले मूळचे सोलापूरकर असलेल्या लोकांबरोबर माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी गुरूवारी संवाद कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले तसेच सोलापूर सोशल फाउंडेशनकडू आवश्यक ती मदत देण्याचे आश्‍वासन दिले.

यावेळी आ. देशमुख यांनी कॉल कॉन्फरन्सद्वारे संवाद सेतूमध्ये पुणे येथे कार्यरत असणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, अत्यावश्यक सेवेत कामकरणारे कर्मचारी, डॉक्टर्स, मेडिकल, उद्योजक, पत्रकार, नोकरदार वर्गाशी संपर्क साधला. पुणेरी सोलापूरकरांना जी मदत लागेल ती सोलापूर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून करण्यात येईल असे आश्‍वासन दिले. हडपसर येथे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून गरज असलेल्या लोकांपर्यंत डबे पोहोचवण्याचे कामसुरू असून गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा, ज्या लोकांना रक्त हवे असेल, ज्यांना राहण्याची अडचण असेल त्यांनी त्यांनी फाउंडेशनशी संपर्क साधावा, वैद्यकीय क्षेत्रात कामकरणार्‍या सोलापूरकरांना पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, असे आश्‍वासन आ. देशमुख यांनी यावेळी दिले.

सोलापूर जिल्हा वेगळ्या उंचीवर जाईल

या कठीण परिस्थितीत पुणे येथील सर्व सोलापूरकरांनी एकमेकांना साथ द्यावी. या परिस्थितीवर आपण नक्कीच मात करून यशस्वीपणे पुढे जाऊ व आपल्या सोलापूरचा विकास करू. असे झाल्यास सोलापूर जिल्हा एका वेगळ्या उंचीवर निश्‍चित जाईल, अशी आशा आ. देशमुख यांनी व्यक्त केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!