Share

महिलांना चरखे देऊन कापड उद्योगाला उभारी देणार : सुभाष देशमुख

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर जिल्ह्यातील जुळे येथे भारतीय जनता पार्टीतर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी महिलांना चरखे देऊन कापड उद्योगाला उभारी देणार असल्याची माहिती दिली.

या कार्यक्रमात बोलताना देशमुख यांनी सोलापूरातील महिलांचा विडीउद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने महिलांच्या हाताला काम देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यातुन चरखे देण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. काल झालेल्या लोकमंगल बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पूरग्रस्तांसाठी १% लाभांश देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सभासदांनी दानशुरपणा दाखवुन त्यांना मिळणारा ११ टक्के लाभांश पूरग्रस्तांसाठी दिले असल्याची माहिती सुभाष देशमुख यांनी दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी शासनामार्फत व लोकमंगल मार्फत सुभाष देशमुख यांनी सर्वसामान्यांना मिळवून दिलेल्या लाभाविषयी माहिती दिली. प्रभारी उमा खापरे यांनी आपल्या भाषणात महिलांना बापूंच्या पाठीशी म्हणजेच तुमच्या आमच्या भावाच्या पाठीशी यापुढे देखील खंबीर उभे राहून पुन्हा एकदा निवडून आणण्याचे आवाहन केले शासनाच्या योजनांची माहिती दिली.

दरम्यान या कार्यक्रमाला महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हा प्रभारी महिला आघाडी मिनाक्षी पाटील, पंचायत समिती उत्तर सोलापूर सभापती संधारणी पवार, सभापती दक्षिण सोलापूर सोनाली कडते, युवा मोर्चा शहराध्यक्ष वृषाली चालुक्य, नगरसेविका, कार्यकर्ते पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!