Share

फडणवीसांच्या भेटीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘ही भेट बंद दाराआड नाही; पुरामुळे दरवाजेच शिल्लक नव्हते’

Published On: 

कोल्हापूर : पूरग्रस्त भागात दौऱ्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीमुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट पूर्वनियोजित नसल्याचं दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

मागील काही दिवसांमध्ये ठाकरेंचा कोल्हापूर दौरा पुढे ढकलण्यात आला होता. याच काळात फडणवीसांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरु केला. आज एकाच दिवशी दोन्ही नेत्यांचा कोल्हापूर दौरा ठरला. काल कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याचा दौरा केल्यानंतर फडणवीस हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज कोल्हापूर शहरात आले. तर, मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर शहरातील शाहूपुरी भागाची पाहणी केल्यानंतर बैठक घेऊन आढावा घेतला.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीसांच्या भेटीवर देखील भाष्य केलं. ‘फडणवीस इकडेच असल्याचं समजल्यानंतर नागरिकांचा प्राण वाचावा यासाठी राजकीय भेद विसरून एकत्र भेटण्यासाठी निरोप पाठवला. त्यांच्या सूचना ऐकून आणखी चांगल्या पद्धतीने काम करता येईल यासाठी मी त्यांची भेट घेतली. आम्ही महाविकास आघाडीतील तीन पक्ष आणि भाजप चौथा असे राज्यातील प्रमुख चार पक्ष एकत्र येऊन कठीण काळात नागरिकांचे प्रश्न सोडवू लागलो तर जनतेचं भलं होईल,’ असं ते म्हणाले.

यासोबतच, ‘आमच्या भेटीत बंद दाराआड काही नव्हतं. पुरामुळे दरवाजेच शिल्लक नव्हते, जी चर्चा झाली ती सर्वांसमोर झाली.’ असं देखील ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं. कोल्हापूर शहरातील शाहूपुरी भागात या दोन्ही नेत्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांची भेट झाली. या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वारशाचे दर्शन घडून आले असून आता पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळेल आणि या पूर प्रश्नावर शासन मार्ग काढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!