Share

खासगी मेडिकल कॉलेजांची मुजोरी बंद करा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यातील खासगी मेडिकल कॉलेजांनी एमबीबीएस आणि बीडीएसच्या राज्याच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. तसेच, राज्य सरकारने खासगी मेडिकल कॉलेजांची मुजोरी फोडून काढण्यासाठी कारवाई करावी. अन्यथा राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रमुख विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.

राज्याच्या शिक्षण शुल्क समितीने मेडिकल कॉलेजांना एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्कात २५ ते ३० टक्क्यांची वाढ करण्याची परवानगी दिल्याने अभ्यासक्रमांच्या शुल्कात भरमसाट वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत कॉलेजांनी आणखी शुल्क वाढवून देण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे (डिएमईआर) केली आहे. तसेच, शुल्क वाढवून देईपर्यत राज्याच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका खासगी कॉलेजांनी घेतली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

सध्या राज्यातील मेडिकल कॉलेजांमधील साडेचार वर्षांचे अभ्यासक्रमाचे शुल्क हे २१ ते ४२ लाख रूपये आहे. समितीने खासगी कॉलेजांनी केलेल्या मागणीनुसार शुल्कवाढ केल्यास हे शुल्क वाढून ५० लाख रूपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ‘एनआरआय’ तसेच व्यवस्थापन कोट्यातील जागांचे शुल्क सध्याच दीड कोटी ते पावणेदोन कोटी रुपयांच्या घरात असून, ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. कॉलेजांचे शुल्क सध्याच सर्वसामान्यांच्या आवाक्यातील नाही. खासगी संस्थांची मागणी मान्य झाल्यास ते त्यांच्या कल्पनेच्याही पलीकडे जाईल.

मात्र, याचा सर्वाधिक फटका हा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रियेत सामील झालेल्या हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना बसला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात आपल्याला प्रवेश मिळणार का? या चिंतेने विद्यार्थ्यांना ग्रासले आहे. त्यामुळे खासगी कॉलेजांच्या मनमानी कारभाराविरोधात राज्याच्या वैद्याकीय शिक्षणमंत्र्यांनी हस्तक्षेप करून संबंधित कॉलेजांवर कारवाईची मागणी अभाविप, एनएसयूआय, मनविसे, युवासेनेने केली आहे.

राज्य सरकारने खासगी कॉलेजांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आदेश द्यावेत. गरज भासल्यास कॉलेजांवर कारवाईची मागणी महाजन यांच्याकडे करण्यात येईल.’- 
कल्पेश यादव मनविसे, शहराध्यक्ष

‘नीटची परीक्षा आल्यामुळे कॉलेजांची दुकानदारी बंद झाली आहे. त्यामुळे आता शुल्कवाढ करण्याची भाषा कॉलेज करत आहे. यात सरकारने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.’
किरण साळी – युवा सेना शहराध्यक्ष

या प्रकरणात अभाविपच्या शिष्टमंडळाने महाजन यांची नुकतीच भेट घेतली आहे. राज्य सरकार आणि शिक्षण शुल्क समितीने खासगी कॉलेजांच्या मागणीला बळी न पडता कॉलेजांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. राज्य सरकारने याबाबत आपली भूमिका तत्काळ जाहीर न केल्यास राज्यात आंदोलने करण्यात येईल – राम सातपुते. अभाविप प्रदेश महामंत्री

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी शुल्कवाढ करणाऱ्या कॉलेजांनर कारवाईची मागणी केली आहे. – अमिर शेख – एनएसयूआय प्रदेशाध्यक्ष

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!