Share

एटिकेटीच्या विद्यार्थ्यांनो आमच्यावर विश्वास ठेवा- उदय सामंत

Published On: 

मुंबई : कोरोनामुळे गेले ३ महिने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. अजून देखील भारतातील कोरोनाचे वाढते प्रमाण हे धोकादायक असून एकट्या महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा आकडा पाहून सर्वजण आवाक झाले आहेत.

भुशी डॅम ओव्हरफ्लो; पर्यटन बंदीमुळे यंदा मात्र शुकशुकाट

एप्रिल, मे हा विविध परीक्षांचा असणारा कालावधी देखील कोरोना महामारीच्या तडाख्यात सापडल्याने सर्व प्रकारच्या परीक्षा महाराष्ट्रात देखील तत्काळ पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ८ मे रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्ष सोडून सर्व वर्षांच्या परीक्षा या रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ३० मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर एटिकेटी व बॅकलॉग परीक्षांचे काय होणार यावरून संभ्रम अजून देखील कायम आहे.

यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले असून ट्विटर द्वारे आशिष शेलार यांनी सातत्याने एटिकेटीच्या विद्यार्थ्यांची व्यथा मांडली आहे. यावर आता पुन्हा एकदा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मौन सोडले असून ट्विटरवरून संदेश दिला आहे. यात मंत्री उदय सामंत म्हणतात, ‘ महाराष्ट्र सरकारने परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच राजस्थान, ओरीसा व पश्चिम बंगाल सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.ATKT च्या विध्यार्थ्यानी सुद्धा विश्वास ठेवा लवकरच मुख्यमंत्री उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली असा निर्णय घेऊ की त्याच अनुकरण देखील इतर राज्य करतील.’

हे खरंच सरकार नाही ‘सर्कस’ आहे, नितेश राणेंनी डागली ‘ठाकरे सरकार’वर तोफ

 

यामुळेच सरकारने परीक्षा रद्द करण्याचा पूर्वी घेतलेल्या निर्णयाचे अनेक राज्ये अनुकरण करत असल्याचे सांगतानाच एटिकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाईल कि इतर राज्य देखील या निर्णयाचे अनुकरण करतील अशी भूमिका मांडली आहे. विद्यार्थी मात्र ठोस निर्णय कधी व काय असणार या चिंतेने ग्रस्त आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!