पुणे – निसर्गाचे वरदान, पावसाची रिपरिप आणि भुशी डॅम च्या पायऱ्यांवर पाण्याच्या प्रवाहाची मजा! लोणावळ्याला पर्वणी ठरलेल्या भुशी डॅम आणि लायन्स पॉईंटवर या मान्सून ऋतूत अक्षरशः पर्यटकांची जत्रा भरलेली असते. मुंबई, पुण्यातील पर्यटकांसाठी अगदी जवळ असलेले हे लोणावळ्याचे निसर्ग सौंदर्य म्हणजे अविस्मरणीय असा सुखावणारा आनंद असतो.
भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला कि विकेंडला मौज-मजा करण्यासाठी अगदी कॉलेज युवकांपासून ते अनेक पर्यटक हे कुटुंबासह लोणावळ्याला हमखास येत असतात. धबधब्यांसह जवळच असलेले कोरीगड व तुंग हे किल्ले ट्रेकर्स ना देखील खुणावत असतात. जवळजवळ लाखांमध्ये जाणारी हि पर्यटक संख्या यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे लोणावळा शहरात जणू निरव शांतता पसरली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार वर्षा पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. मावळ, मुळशी येथील सर्व पर्यटन ठिकाणे पर्यटकांसाठी बंद असून पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे. त्यामुळे या भागातील पर्यटनावर अवलंबून असलेल्या नागरिकांचे मात्र आता आर्थिक नुकसान होत आहे. अर्थिक नुकसान झाले तरी चालेल मात्र सुरक्षितता महत्वाची अशी भावना देखील अनेक व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
मोठी बातमी : संपूर्ण महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढला
कास पर्यटकांमुळे यवतेश्वर घाटात ट्रॅफीक जाम
पर्यटकांसाठी खुशखबर ! चार दिवसातच भुशी धरण ओव्हरफ्लो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

