🕒 1 min read
औरंगाबाद: कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन एमपीएससीच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहे. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यासह औरंगाबादेत देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत परिक्षार्थ्यांचे आंदोलन पेटले आहे. औरंगाबाद येथील महात्मा फुले चौकात एमपीएससीच्या परिक्षार्थींनी मोठा राडा घातला. शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर एकत्र येत या निर्णयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांना परिक्षार्थ्यांना आंदोलन थांबवण्याची सूचना केली आहे. मात्र परिक्षार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत आयोगासह सरकारचा निषेध व्यक्त केला. तर पोलीस आणि प्रशासनाने हे आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न करत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोन दिवसावर म्हणजेच 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. औरंगाबादमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले असून रस्त्यावर उतरलेत. लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. पोलीस प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मनपा आयुक्तांच्या ‘त्या’ वाक्यावर काहीच बोलावसं वाटत नाही’
- पालिकेच्या फिरत्या पथकांचा आता ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर
- सरकारने MPSCच्या विद्यार्थ्यांचं वाटोळंच करायचं ठरवलंय : राम सातपुते
- परभणीमध्ये कुऱ्हाडीने मारहाण करून पायाची बोटे तोडली
- MPSC परीक्षा पुढे ढकलून मराठा विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार – शिवसंग्राम

