Share

एसडीआरएफ मधून नांदेड जिल्ह्याला ५२ रुग्णवाहिका, कोरोना रुग्णांना होणार मदत

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : जिल्ह्यातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यासाठी ३०.७६  कोटी रुपयांची तरतूद राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मधून मंजूर करण्यात आला होता. यातील काही रक्कम शिल्लक राहिली होती. या शिल्लक रक्कमेतून जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ५२ नव्या रुग्णवाहिका राज्य शासनाने मंजूर केल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यातील कोरोना प्रादुर्भाव असलेल्या अनेक जिल्ह्यांना एसडीआरएफच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीचा उपयोग त्या त्या जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी करण्यात यावा, असे निर्देश राज्य शासनाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. नांदेड जिल्ह्याने या पद्धतीने कोरोना विषाणूचा संसर्ग रोकण्यासाठी या निधीतील बहुतांश रक्कम उपयोग आणला आहे.

परंतु ३०. ७६ पैकी काही निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे शिल्लक राहिला होता. या उर्वरित निधीतून जिल्ह्यासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्याची मंजुरी देण्यात यावी, असा प्रस्ताव पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनास पाठवला होता. या प्रस्तावास मंजुरी देत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन व मदत आणि पुनर्वसन विभागाने नांदेड जिल्ह्यासाठी ५२ नव्या रुग्णवाहिका एसडीआरएफच्या माध्यमातून खरेदी केल्या आहेत. हा संपूर्ण निधी राज्य शासनाचाच असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या वेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या       

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!