Share

सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एनआयएकडून सचिन वाझे प्रकरणात कसून तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी रोज एक नवीन माहिती समोर येत आहे. आता एनआयएने आणखी एक मर्सिडीज जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणा संबंधित ५ वाहने जप्त करण्यात आली असून, यापूर्वी एक मर्सिडीज, इनोव्हा, प्रॅडो आणि एक स्पॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे.

त्यानंतर एनआयए आणि एटीएसने सीसीटीव्हींची तपासणी केली असता सीसीटीव्हीमध्ये सचिन वाझे आणि मनसुख हिरेन फेब्रुवारी महिन्यात काही मिनिटांसाठी भेटले असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले आहे.

फेब्रुवारीला हिरेन आणि वाझे यांच्यात फोर्टमध्ये जीपीओजवळ मर्सिडीज कारच्या आत काही मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर हिरेन ओला कॅबने दक्षिण मुंबईत गेले होते. आपली स्कॉर्पिओ मुलूंड-ऐरोली रोडला बंद पडल्याचा दावा त्यांनी केला होता.

पुढे यामध्ये सचिन वाझे मुंबई पोलीस मुख्यालयातून मर्सिडीजमधून बाहेर पडताना दिसत आहेत. यानंतर त्याची गाडी सीएसएमटीबाहेर सिग्लजवळ उभी असल्याचं दिसलं आहे. सिग्नल सुरु झाल्यानंतर मर्सिडीज त्याच जागी उभी असते आणि वाझेंनी पार्किग लाईट सुरु करुन ठेवलेली असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे.

मनसुख हिरेन काही मिनिटांनी रस्ता ओलांडून येतात आणि मर्सिडीजमध्ये बसतात. यानंतर मर्सिडीज जीपीओच्या समोर उभी असते. यानंतर हिरेन गाडीतून बाहेर पडतात आणि गाडी पुन्हा पोलीस मुख्यालयात प्रवेश करताना दिसत आहे.

मनसुख हिरेन यांनी सीएसएमटीला ज्या ओला कॅबने प्रवास केला त्या चालकाने एटीएसला माहिती सांगितले की ,हिरेन यांना प्रवासादरम्यान पाच वेळा फोन आला. हा फोन वाझे यांनी केल्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. हिरेन यांना पोलीस मुख्यालयासमोर रुपम शोरुमजवळ भेटण्यास सांगण्यात आले होते. पण नंतर शेवटच्या फोनला जागा बदलून सीएसएमटी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!