🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
राज कुंद्रा यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे आहेत. त्यांच्याविरोधात अनेक आयपीसी कलमांसोबतच आयटी अॅक्ट कलम 67, 67A लावले गेले आहेत. त्यातील 67A हे पोर्नोग्राफी संदर्भात आहे. तो अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यात पहिल्यांना गुन्हा केला असेल तर 3 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड आकारला जातो. एकाच व्यक्तीने दुसऱ्या वेळीही तोच गुन्हा केल्यानंतर तर त्याला 5 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड आहे. तर तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास 7 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंडाची तरदूत आहे.
या प्रकरणात राज कुंद्रा यांना 3 वर्षांसाठी तुरुंगात जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असा अंदाज कायदे तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान सध्या राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन जॉन मायकल थार्प या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महापौर, उपसचिव, उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुखांसोबत खैरेंचे विठ्ठल दर्शन, अन वारकऱ्यांसाठी ‘देऊळ बंद’
- ‘१२ आमदारांच्या नियुक्त्या का केल्या नाहीत?’, हायकोर्टाच्या प्रश्नांमुळे राज्यपालांची कोंडी
- ‘या’ कारणामुळे मी फडणवीसांना माझा नेता मानत नाही; पंकजा मुंडेंचा खुलासा
- ओबीसी आरक्षणात मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार हेच झारीतील शुक्राचार्य-चंद्रशेखर बावनकुळे
- सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा खरचं पचणी पडणारा आहे का?


