पुणे : उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या अंगावर मोटार घालून चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी ( दि. ११) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह आघाडीतील घटक पक्ष आणि संघटना सहभागी होणार आहेत. त्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली आहे. भारतीय जनता पक्षाने या बंदला विरोध केला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर ‘महाविकास आघाडी’ने जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चाचे आयोजन केले आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त, आठ सहायक पोलीस आयुक्त, १३, पोलीस निरीक्षक, ७६ सहायक पोलीस निरीक्षक, ८७, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह सुमारे तीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- खेळाडूंसाठी ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय; शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव
- ‘शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही’
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

