Share

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुन्हा कडकडीत लॉकडाऊन

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ पाहत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु असताना काही जिल्हाय्त कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढ होत असल्याने लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. भिवंडी, अंबरनाथ, ठाणे, मीरा भाईंदर, रत्नागिरी, नवी मुंबई यांच्यासह अनेक ठिकाणी लॉकडाउन जाहीर झालेला असताना आता औरंगाबादमध्येही लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. औरंगाबाद शहर आणि वाळुंज परिसरात हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत जुनी शनाया परतणार

कोरोनाने हाहाकार माजवलेल्या औरंगाबादमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरामध्ये १० ते १८ जुलै दरम्यान पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. शहरातील अत्यावश्यक सेवेसाठी सर्व निर्णय पोलिस आयुक्त आणि मनपा आयुक्त जाहीर करणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी माहिती दिली.

‘कोरोना’ग्रस्त महिला आमदाराचे जंगी बर्थडे सेलिब्रेशन, सोशल मिडीयावर झाल्या ट्रोल

महाराष्ट्राचा एकूण विचार केला असता काल (5 जुलै) दिवसभरात 6 हजार 555 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 6 हजार 619 वर पोहचली आहे. यापैकी 8 हजार 822 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 11 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र या सोबत नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!