Share

‘कोरोना’ग्रस्त महिला आमदाराचे जंगी बर्थडे सेलिब्रेशन, सोशल मिडीयावर झाल्या ट्रोल

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. मात्र अनेक नेत्यांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. मिरा भाईंदरमधील ‘कोरोना’ग्रस्त आमदार गीता जैन यांनी घरी वाढदिवस साजरा करतानाचे फोटो समोर आले आहेत. होम क्वारंटाईन असताना त्यांनी पतीसह केक कापून सेलिब्रेशन केले.

चीनने गुडघे टेकले, गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य दीड किलोमीटर मागे हटलं

आमदार गीता जैन यांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे नुकतेच निष्पन्न झाले होते. यानंतर एकच खळबळ उडाली होती.विशेष म्हणजे गीता जैन आणि त्यांचे पती दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मिरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दोघांना होम क्वारंटाईन केले आहे.

5 जुलै रोजी गीता जैन यांचा वाढदिवस होता. दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांनी केक कापून घरात एकमेकांबरोबर वाढदिवस साजरा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले असून अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहेत.

प्रवीण तरडेंनी केली नव्या सिनेमाची घोषणा

एका बाजूला सर्वसामान्य जनतेला सरकार नियम पाळायला सांगत आहे मग या आमदारावर मेहेरबानी का करण्यात येत आहे असा सवाल जैन यांच्या कृतीमुळे उपस्थित झाला आहे. जर नेते असं बेजबाबदारपणे वागणार असतील तर सर्वसामन्यांनीच फक्त नियम पाळावे का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!