Share

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत जुनी शनाया परतणार

Published On: 

मुंबई : सद्या जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे, त्यानंतर सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे जवळपास तीन महिने मालिकांचं शूटिंग बंद होतं. मात्र आता काही अटीशर्तींचे पालन करत या शूटिंगला सुरुवात झाली आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचंही शूटिंग सुरू आहे. या मालिकेतील शनाया अर्थात रसिकाने काही महिन्यांपूर्वी या मालिकेतून बाहेर पडली होती. तिच्या जागी इशा केसकरने शनायाची भूमिका साकारली होती. आता या मालिकेत पुन्हा एकदा रसिका सुनील शनायाच्या भूमिकेत परतणार असल्याचं कळतंय. ‘लोकसता’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

या मालिकेत सध्या शनायाची भूमिका साकारणारी इशा काही वैयक्तिक कारणामुळे मालिका सोडत असल्याचं कळतंय. त्यामुळे तिच्या जागी पुन्हा एकदा जुनी शनाया परतणार आहे. यापूर्वी चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन शिकण्यासाठी रसिका परदेशी गेली होती. त्यामुळे तिने ही मालिका सोडली होती.

या मालिकेत अभिजीत खांडकेकर, अनिता दाते यांच्या मुख्य भूमिका आहेत. नवरा बायकोच्या गोड संसारात जेव्हा नवऱ्यावर हक्क सांगणारी एखादी तिसरी व्यक्ती येते तेव्हा हक्काची बायको तिला नवऱ्यापासून दूर ढकलत तिचा तिरस्कार करते ? की संसारातील एक आव्हान म्हणून तिचा स्वीकार करते ? याची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.

आजोबा होण्याच्या वयात झाले बाबा, उद्योजकाच्या तिसऱ्या पत्नीने दिला गोंडस मुलाला जन्म

बदल्यांच्या वादानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख घेणार उद्धव ठाकरेंची भेट

गरिबांच्या खात्यात प्रति महिना ७५०० रू. थेट जमा करा – थोरात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!