मुंबई : देशभरात इंधनाच्या किमंती चांगल्याच वाढल्यात. महाराष्ट्रासह अनेक शहरातील पेट्रोलने शंभरी गाठली आहे. यावरून केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे. यावर उपाययोजना करण्याऐवजी केंद्रातील मंत्री अजबगजब विधाने करत असल्याचे दिसत आहे. अशातच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक मजेशीर बाब सांगितली आहे. पेट्रोल डिझेलचे भाव दर हिवाळ्यात वाढतात असा दावाच त्यांनी केला आहे.
धर्मेंद्र प्रधान हे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. मात्र, हा हिवाळा गेला की इंधनाच्या किमती कमी होतील. हे आंतरराष्ट्रीय प्रकरण आहे. सध्या मागणी वाढल्याने इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. असे हिवाळ्यात होतच असते. पण किमती कमी होतील.
दरम्यान, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही इंधन दरवाढीवर चिंता व्यक्त केली आहे. इंधन दरवाढ कधी थांबणार हे आपल्याला सांगता येणार नाही. तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती या धर्मसंकट असल्याचंही सीतारमण म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी या दरवाढीसाठी इंधन उत्पादक देश जबाबदार असल्याचे म्हटले होते. ‘गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. असे असले तरी विकासकामांसाठी कर महत्त्वाचा आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार नाही’ असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी पेट्रोलच्या किंमती या तेल उत्पादक देशांमुळेच वाढत असल्याचा दावा केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- खाकीतील सौंदर्यवती! उपनिरीक्षक पल्लवी जाधवच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज
- महत्त्वाचे! पूजा चव्हाण प्रकरणी पहिला खासगी खटला दाखल
- आश्चर्यम! बीड जिल्ह्यात भाजपच्या मदतीला धावली शिवसेना
- धनंजय मुंडेकडून बीडची पालिका ‘टार्गेट’, नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
- ‘बदनामी करू नका, अन्यथा आम्हालाही जीव द्यावा लागेल’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
