Share

जालन्यातील लोधी मोहल्ला भागात तुफान दगडफेक; दोन पोलीस कर्मचारी जखमी

Published On: 

जालना: एकीकडे कोरोनाच्या परिस्थितीमुळे जालनावासी हैराण आहेत तर दुसरीकडे गुन्हेगारी देखील वाढत आहेत. काहीही कारण नसताना किंवा किरकोळ कारणांवरून वाद होत आहेत आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत होत आहे. अशीच एक घटना शहरातील लोधी मोहल्ल्यात घडली आहे. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोधी मोहल्ला भागातील दर्गा वेस जवळ ही घटना घडली असून तेथील वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. या दगडफेकी मध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून या घटनेची माहिती कळताच शहरातील विविध भागातील पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी देखील घटनास्थळी धाव घेत तेथील घडलेल्या प्रकारची विचारपूस करत कारवाई सुरु केली.

सदर बाजार पोलिसांनी परिसरातील १० संशयितांना ताब्यात घेतले आहे, घडलेल्या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचे कारण आद्यपही समजले नाही. मात्र कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून आलेल्या कुठल्याही मजुकरावर विश्वास ठेऊन कुठलेही पाऊल उचलू नये असे आवाहन येथील पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!