औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यात मागील काही दिवसापासून शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या बाबत अनेक वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्या तरीही स्थानिक प्रशासनयाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे ऐतिहासिक शहराची प्रतिमा मलीन होत असून प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन हे अवैध धंदे बंद करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
खुलताबाद तालुका हा ऐतिहासिक पर्यटन शहर म्हणून जगाच्या नकाशावर ओळख आहे. याठिकाणी अनेक देशातील पर्यटक येथे येऊन ऐतिहासिक शहराचे गुणगान गातात परंतु येथील हॉटेलवर चालणारे अवैध धंदे पाहून त्यांच्या आनंदावर विरजन पडत आहे. हॉटेल व्यवसाय मध्ये एकमेकाच्या विरोधात स्पर्धा वाढवून धंद्याला ऊत आला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी म्हैसमाळ येथील जुगार अड्ड्यावर व खुलताबाद शहरात धाड मारण्यात आल्या आहे. परंतु एक दोन कारवाई नंतर प्रशासन पुन्हा शांत झाले आहे.
खुलताबाद शहर व ग्रामीण भागात सुरु असलेले मटका, वाळू ,अवैध मुरूम, माती, तसेच हॉटेलमधील वेश्याव्यवसाय आदी धंद्यांना लवकरात लवकर लगाम लावावा. नसता वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करेल असा इशारा निवेदन देऊन करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका भाजपने घेतलाय – नाना पटोले
- राणेंची अवस्था पाण्यातून काढलेल्या माश्यासारखी; जयंत पाटलांचा घणाघात
- सायंकाळपर्यंत सरकार मधील आणखी एक मंत्री घरी जाईल :चंद्रकांत पाटील
- शरद पवारांच्या भेटीमध्ये फक्त हवा-पाण्याच्या गप्पा झाल्या – संजय राऊत
- …म्हणून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला पाहिजे; दरेकरांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

