मुंबई : दोन दिवसांपूर्वी भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवल्याचं सांगितलं आहे.
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे, असं भाजप नेते नारायण राणे यांनी सांगितलं आहे.
नारायण राणेंच्या या मागणीनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील नारायण राणेंवर टीका केली आहे. ‘नारायण राणे यांना पुन्हा कधी सत्तेत जाऊन बसतो, असे झाले आहे. पाण्याच्या बाहेर असल्यावर माशाची जशी तडफड होते त्याप्रमाणे नारायण राणे यांची अवस्था झाली आहे. काहीही झाले की ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करतात. असे असेल, तर मग पहिला उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल,’ असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिलं आहे.
तर, शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी देखील राणेंच्या या मागणीची खिल्ली उडवली आहे. ‘नारायण राणेंना काही कामधंदा उरलेला नाही. भाजपने सुद्धा त्यांना अडगळीत फेकून दिले आहे. अमित शहा यांनीही त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही. त्यांचं पत्रं केऱ्याच्या टोपलीत फेकून दिलं आहे,’ अशी बोचरी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका भाजपने घेतलाय – नाना पटोले
- आंबेडकरी अनुयायांनी महाड चवदार तळे येथे गर्दी करू नये; आठवलेंच आवाहन
- सायंकाळपर्यंत सरकार मधील आणखी एक मंत्री घरी जाईल :चंद्रकांत पाटील
- शरद पवारांच्या भेटीमध्ये फक्त हवा-पाण्याच्या गप्पा झाल्या – संजय राऊत
- …म्हणून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला पाहिजे; दरेकरांची मागणी


