Share

‘सारथी बंद करून दाखवाच मग बघू मंत्री नव्या गाडीतून कसे फिरतात’

Published On: 

मुंबई : सारथी संस्थेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. सारथी संस्था बंद केल्यास राज्यातील मंत्र्यांना नव्या गाडीतून महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. राणे यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली आहे. राज्यातील मंत्रीच जातीजातीत भांडणं लावून अंग काढून घेऊ लागले आहेत. मग हे सरकार काय कामाचे? असा सवाल करतानाच सारथीला बंद करून दाखवाच, मग बघू मंत्री नव्या गाडीतून महाराष्ट्रात कसे फिरतात, असा इशारा राणे यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात सारथीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे टाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

दरम्यान, मराठी क्रांती मोर्चाने सारथी संस्थेवरुन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सारथी संस्थेची स्वायत्तता धोक्यात आणली असून, वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाने वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

‘मागील सरकारने आमच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य केल्या होत्या. विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करतोय. सारथीची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. विजय वडेट्टीवार मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या आंदोलनावेळी जो शब्द दिला होता,तो सरकारने पाळावा असे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले आहे.

कोविड योद्धे वगळता इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात – विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रात माणसांच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलेलं नाही; नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मराठा आरक्षण : अंतिम निकालपत्रात आमदार नितेश राणे यांचे नाव

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!