Share

कोविड योद्धे वगळता इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात – विजय वडेट्टीवार

Published On: 

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने राज्य सरकारच्या महसूलाला मोठा फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगार देण्यासाठी कर्ज काढावे लागेल काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असेल तरी कोविड योद्धा जे आहेत, ते वगळता इतर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,’ अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार गुरुवारी दिली आहे. चार महत्वाचे विभाग वगळता इतर विभागांमध्ये काटछाट करण्याची वेळ येऊ शकते, असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.

मुख्यमंत्र्यांपेक्षा संत नेहमीच श्रेष्ठ आहेत हे ध्यानात घ्यावे, रयत क्रांती संघटनेचा हल्लाबोल

यावेळी ते म्हणाले की, सारथी संस्था सुरू राहील. यावर्षी देखील सारथी संस्थेसाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. मात्र सारथी बद्दल काहीजण गैरसमज पसरवून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. हे राजकारण कोण करतय याबद्दल मी आत्ता बोलणार नाही, असं ते म्हणाले.

वडेट्टीवार म्हणाले की, सारथीच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. फक्त प्रशिक्षण देण्यापुरती सारथी मर्यादित राहणार नाही. सारथीला साधारणपणे 38 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. येणाऱ्या कॅबिनेट मिटींगमध्ये याचा निर्णय घेणार आहे, असं ते म्हणाले.

मानलं तुम्हाला; रितेश व जेनेलिया देशमुखनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सारथीला आम्ही आर्थिक मदत नक्की करणार आहोत. पण त्यामधे थोडं पुढं मागं होऊ शकतो. कारण आधी कोरोनासाठी काम करणाऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती गंभीर आहे आणि ती पुढच्या डिसेंबरपर्यंत चालेल असं तज्ञ सांगतात, असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!