Share

महाराष्ट्रात माणसांच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलेलं नाही; नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Published On: 

मुंबई : करोनाग्रस्त रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. मुंबईतील परिस्थिती गंभीर असताना आमदार नितेश राणे यांनी एका रुग्णाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या हा रुग्ण नीट लक्ष दिलं जात नसल्याचं सांगत आहे.

याचाच धागा पकडत भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर शाब्दिक निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्रात माणसांच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलेलं नाही,’ अशा तिखट शब्दात राणे यांनी सरकारवर टीका केली आहे.

पुढे राणे म्हणतात, ‘शताब्दी हॉस्पिटल. महाराष्ट्रात जिवाचं काहीही मूल्य राहिलेलं नाही. ५० दिवस सरकारचं ऐकून घेतल्यानंतरही प्रत्येक दिवशी हे बघायला मिळत आहे. मग आपल्याला या सरकारची गरज काय? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मुंबईत शनिवारी ७२२ नवीन रुग्ण वाढले असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींची संख्या ४८९ पर्यंत पोहोचली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दररोज ७०० च्या वर रुग्ण सापडत आहेत, तर संशयित रुग्णांची संख्याही वाढत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!