Share

घराकडे जाण्यासाठी गर्दी करणाऱ्यांना मोदींचं आवाहन; काही दिवस जिथे आहात तिथेच थांबा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात कोरोनाचे रुग्णांच्या संख्येत रोज झपाट्याने वाढ होत आहे. या व्हायरसचा फैलावाला अटकाव घालता यावा यासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने जवळपास १० शहर लॉक डाऊन केले आहेत. त्यामुळे बहुसंख्य कामगारवर्ग घरी निघाला आहे.

परंतु यामुळे रेल्वे , बस स्थानक या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली आहे आणि त्यामुळे हा संसर्ग फैलावण्याचा धोका अजूनच वाढला आहे. याची दखल घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही मुख्यमंत्र्यांना रेल्वे मंत्र्यांना अधिक अधिक गाड्या सोडाव्या अशी मागणी करण्याची विनंती केली आहे.

आता पंतप्रधान नंरेंद्र मोदी यांनीही याची दाखल घेतली आहे. त्यांनी ट्वीटरवरून या गर्दी करणार्यांना आहे तिथेच थांबण्याचं आवाहन केलं आहे.  ते म्हणाले, ‘कोरोनाच्या भीतीपोटी, माझे बरेच देशवासी ज्या ठिकाणी रोजगारा करतात ती शहरे सोडून आपल्या गावी परतत आहेत. गर्दीत प्रवास केल्याने कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढतो. आपण जिथे जात आहात तेथे लोकांसाठी देखील धोका आहे. आपले गाव आणि कुटुंबाच्या अडचणी देखील वाढवतील.’

 

तसेच पुढे ते म्हणाले, ‘ मी विनंती करतो की आपण ज्या शहरात आहात काही दिवस तिथेच थांबा. याद्वारे आपण सर्वजण हा रोग पसरण्यापासून रोखू शकतो. रेल्वे स्टेशन, बसस्थानके येथे गर्दीकरून आपण आपल्याच आरोग्याशी खेळत आहोत. कृपया आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची चिंता करा, जर आवश्यक नसेल तर आपले घर सोडू नका.’

हेही पहा –

https://www.youtube.com/watch?v=vK5–X2kY2M

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!