🕒 1 min read
नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री पद भूषविणारे अरुण जेटली 9 ऑगस्ट 2019 रोजी, त्यांना श्वासोच्छवासाच्या तक्रारीनंतर गंभीर स्थितीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली येथे दाखल केले गेले. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी, जेटली जीवन लाइफ सपोर्टवर होते. 23 ऑगस्टपर्यंत त्यांची तब्येत ढासळली होती. जेटली यांचे वयाच्या 66 व्या वर्षी 24 ऑगस्ट 2019 रोजी ) निधन झाले.
या वेळी आता दिवंगत केंद्रीय मंत्री अरुण जेटलींचा ६८ व्या जयंतीनिमित्त दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर दिवंगत केंद्रीय मंत्री आणि दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) माजी अध्यक्ष अरुण जेटली यांचा पुतळा बसवला जाणार आहे. जेटलींच्या ६८ व्या जयंतीनिमित्त सहा फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले जाईल. गृहमंत्री अमित शाह स्वत: पुतळ्याचे अनावरण करतील.
जेटली हे १४ वर्ष डीडीसीएचे अध्यक्ष होते. आता त्यांचा मुलगा रोहन जेटली डीडीसीएचे अध्यक्ष आहेत. जेटली यांचा पुतळा राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि राम सुतार ललित कला प्रायव्हेट लिमिटेड यांच्या हस्ते तयार होईल. या दोन कंपन्यांनी गुजरातमध्ये जगातील सर्वात उंच सरदार पटेल पुतळा तयार केला. स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाच्या या पुतळ्याची उंची ५९७ फूट आहे.
अनिल सुतार यांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना जेटलींच्या पुतळ्याच्या तयारीला दुजोरा दिला. ऑक्टोबर महिन्यात डीडीसीएच्या अॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीत स्टेडियममध्ये जेटलींचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी १२ सप्टेंबर रोजी फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नाव अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले. हे स्टेडियम १९९३ मध्ये बांधले गेले.
या आधी नुकतच खासदार झाल्यानंतर मनोज तिवारी यांनी आपल्या गावात अतरवालिया येथे सचिन तेंडूलकर च्या नावाने एक मोठे स्टेडियम उभारण्यासंबधी वक्तव्य केले आहे. तर तिवारी यांनी आपल्या गावात घराजवळ सचिन तेंडुलकरची मुर्ती बनवली होती. तसेच तिथे मंदिर बांधण्याचीही चर्चा होती.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना योद्ध्यांच्या लढ्यामुळेच संकटावर मात – राज्यपाल
- King Is Back : युवीचे पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन ‘या’ संघाकडून खेळण्याची शक्यता
- अशा लोकांना लाथेने तुडवलं पाहिजे; सरनाईकांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निलेश राणेंचा घणाघात
- बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 21 लाखांचा निधी देणार- अभिमन्यू पवार
- ग्रामपंचायत निवडणूक : जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
