मुंबई : नुकत्याच बीसीसीआयने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात रोमांचक सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या तारखा घोषित केल्या आहेत. १० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. ६ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. लवकरच या स्पर्धेच्या पूर्ण वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, बीसीसीआयने अशी माहिती दिली आहे.
दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन करणार आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये युवराजची पंजाबच्या संभाव्य 30 खेळाडूंच्या टीममध्ये निवड झाली आहे, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. 18 डिसेंबरपासून लुढियानामध्ये पंजाबच्या ट्रेनिंग कॅम्पला सुरुवात होणार आहे. युवराजने आधीपासूनच आयएस ब्रिंदा पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मोहाली स्टेडियममध्ये सरावाला सुरूवात केली आहे.
युवराजला पंजाबकडून खेळण्याची परवानगी मिळणार का नाही, याबाबत अजून काही स्पष्ट झालेलं नाही. मागच्यावर्षी युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर तो कॅनडामधल्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये खेळला. बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडूंना परदेशातल्या टी-20 लीगमध्ये खेळायची परवानगी नाही.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राजकीय हेतूने- दरेकर
- मोदी सरकारसाठी शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी तर भांडवलदार हे उत्तम मित्र- राहुल गांधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

