Share

संतापजनक: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; कर्नाटक सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?

Published On: 

बेळगाव: मराठी-कानडी वाद हा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून चालत आला आहे. बेळगाव सीमावाद, मराठी भाषिकांना वेळोवेळी कर्नाटक सरकारशी संघर्ष करावा लागला आहे. तर, आता एक सणक आणणारी घटना समोर येत आहे. बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे. हि बातमी बाहेर येताच आता शिवभक्तांकडून संताप व्यक्त केला आहे.

तर, कर्नाटक सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे, स्वातंत्र्याचे प्रणेते म्हणून फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आदराने पुजले जातात. कर्नाटकमधील या घटनेने मात्र आता कर्नाटक सरकारचा मराठी भाषिकांविरोधात असलेला द्वेष समोर येत असल्याचे दिसत आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील शिवभक्त उद्या रविवारी (९ ऑगस्ट) रोजी कर्नाटकात जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.

पीककर्ज वितरणासाठी भाजप किसान मोर्चातर्फे बँकांमध्ये ठिय्या आंदोलन करणार – डॉ. बोंडे

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला असता मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला. तर मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या परवानगीनं शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे. यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिले आहे.

निजामाच्या ‘त्या’ २६५ कोटींवर मराठवाड्याचा हक्क!

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसवला होता. मात्र, शुक्रवारी अचानक बेळगाव जिल्हा प्रशासनानं रातोरात हा पुतळा हटवला. गावातील दुसऱ्या गटातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर हा पुतळा हटवण्यात आला. त्यामुळं या भागात तणावाच वातावरण निर्माण झालं.विविध ठिकाणी या संदर्भात आंदोलनं करण्यात येत आहेत. सोमवारपर्यंत महाराजांचा पुतळा पुन्हा बसवला नाही तर मनगुत्तीमध्ये जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा सीमा भागातील मराठी बांधवांनी दिला आहे.

दीपक साठेंनी कसे वाचवले प्रवाशांचे प्राण? फेसबुक पोस्टद्वारे भावाने सांगितले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!