नवी दिल्ली- केरळ विमान दुर्घटनेत महाराष्ट्राच्या सुपुत्राने जीव गमावला आहे. ही दुर्घटना घडली तेव्हाच पायलटचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. हे पायलट महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. दीपक वसंत साठे असं अपघातात ठार झालेल्या वैमानिकाचं नाव आहे.
केरळमधल्या कोझिकोड येथील विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला ला भीषण अपघात झाला. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघातात पायलट दीपक वसंत साठे यांचाही मृत्यू झाला आहे.
दीपक साठे यांचे चुलत बंधू निलेश साठे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी आतापर्यंत त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नेमकं काय घडलं होतं, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या पोस्टवरून दोन्ही वैमानिकांनी पराकोटीचं प्रसंगावधान राखल्याचं दिसून येत आहे. निलेश साठे यांनी म्हटलं आहे की ‘विमानाचे लँडीग गिअर काम करत नव्हते.
हवाई दलाच्या या माजी वैमानिकाने (दीपक साठे) विमानतळाभोवती तीन फेऱ्या मारत विमानातील इंधन संपवलं होतं. यामुळे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर आग भडकली नाही. यामुळे विमान दुर्घटनेनंतर धुराचे लोळ उठलेले दिसले नाहीत. विमान लँड करण्याच्या आधी इंजिन बंद करण्यात आले होते. तीनदा आदळल्यानंतर विमानाचा मध्यभाग जमिनीला टेकला होता. विमानाचा उजवा पंख क्षतिग्रस्त झाला होता.’
दीपक साठे यांचा एअरफोर्समध्ये असताना नव्वदीच्या काळात विमान अपघात झाला होता. तेव्हा ते सहा महिने रूग्णालयात उपाचर घेत होते. यानंतर ते पुन्हा कधी विमान उडवू शकतील असा कुणीही विचार केला नव्हता. पण प्रचंड इच्छा शक्ती आणि विमान उडविण्याच्या प्रेमापोटी त्यांनी पुन्हा आकाशात भरारी घेतली आणि तो एक चमत्कारच होता.
दीपक साठे यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुलं जे आयआयटी मुंबईतून पास झाले आहेत. दीपक साठे यांच्या कुटुंबातच शौर्य आहे. त्यांचे वडील कर्नल वसंत साठे जे नागपुरात राहतात. तर त्यांचे भाऊ कॅप्टन विकास साठे हे देखील आर्मीमॅन होते असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
मृत्युदर जास्त असणाऱ्या १० प्रमुख जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित
तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार
‘नागरिकांच्या सहकार्याशिवाय ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

