Share

आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी राज्याचे ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण’

Published On: 

लातूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मिती व्हावी या दृष्टीने ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण’ कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या १५ ते ४५ वयोगटातील एक हजार उमेदवारांना हेल्थकेअर क्षेत्रात ऑन जॉब ट्रेनिंग देण्यात येणार आहे. गेल्या वर्षीपासून कोरोना या महामरीमुळे आरोग्य क्षेत्रात अनेक संधि उपलब्ध झाल्या आहेत त्यासोबतच आता आरोग्य क्षेत्रात परिस्थिति पाहता गरज देखील भासत आहे त्यामुळे हा उपक्रम वैद्यकीय तसेच इतर सर्वांसाठीच उपयोगाचा ठरणार आहे.

शासकीय आणि खाजगी रुग्णालये व वैद्यकीय शिक्षण संस्थांमार्फत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदरचे प्रशिक्षण पूर्णपणे निःशुल्क असून प्रशिक्षणानंतर रोजगार सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. सदरील प्रशिक्षण लवकरात लवकर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर, सार्वजनिक रुग्णालय, उदगीर व उप जिल्हा रुग्णालय, निलंगा येथे सुरु करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी गुगल फॉर्म लिंक https://forms.gle/ceRXn7kXutcniaqJA वर नोदणी करणे आवश्यक आहे.

आरोग्य क्षेत्रात अनेक संधि उपलब्ध झाल्या आहेत त्यासोबतच आता आरोग्य क्षेत्रात परिस्थिति पाहता गरज देखील भासत आहे त्यामुळे हा उपक्रम वैद्यकीय तसेच इतर सर्वांसाठीच उपयोगाचा ठरणार आहे. वर दिलेल्या लिंक वरुण नोंदणी केल्यानंतर अधिक माहितीसाठी ०२३८२-२४५१८३ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा laturrojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!