Share

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज पासून

Published On: 

🕒 1 min read

 

मुंबई : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज पासून सुरू होत आहे. 14 विधेयक या अधिवेशनात शासनाकडून मांडण्यात येणार आहेत. तर शेतकरी कर्ज माफी – त्याचे निकष, तूर खरेदी, मंजुळा शेट्ये प्रकरण, एसआरए मधील घोटाळे, शिक्षण विभागातील गोंधळ, समृद्धी महामार्ग आदी वरून विरोधक सरकारची कोंडी करु शकणार आहेत. मात्र सध्या विरोधकातच फूट पडल्याच चित्र काल झालेल्या वेगवेगळ्या बैठका आणि पत्रकार परिषद यावरुन दिसून आलं.

इंदिरा गांधी यांच्या जयंतीची शताब्दी बाबतचा प्रस्ताव आधी कि शरद पवार यांच्या 50 वर्षांच्या कारकीर्द बाबतच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आधी यावरून दोन्ही काँग्रेस मध्ये जुंपली आहे. या दुफळीचा फायदाच सत्ताधारी करून घेण्याची शक्यता आहे. म्हणूनच विरोधकात ‘टायपिस्ट’ हाच दुवा असल्याचा टोला काल मुख्यमंत्र्यानी लगावला आहे. अधिवेशनाच्या मुहूर्तावरच कर्ज माफीची अमलबजावणी सुरू करण्याचा प्रयत्न ही सरकार करत आहे. एकीकडे राष्ट्रपती निवडणूकीत अदृश्य हात मिळाल्याने भाजपच्या गोटात आनंद आहे त्यामुळे आता शिवसेना अधिवेशनात काय भूमिका घेते याकडे ही लक्ष लागलं आहे..

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!