Share

राज्य सरकार किती मेहरबान, खरीप पिकाचे शेतकऱ्याला केवळ ४ रुपये अनुदान

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी हैराण झाला आहे, पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागत आहे, दुसरीकडे सरकारी यंत्रणाकडून शेतकऱ्याची थट्टा होताना दिसत आहे. माढा तालुक्यातील शेतकऱ्याला खरीप अनुदान म्हणून केवळ ४ रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारला खरच बळीराजाची काळजी आहे का ? असा सवाल निर्माण होत आहे.

माढा तालुक्यातील ढवळस गावातील शेतकरी असणारे पंडित इंगळे यांना २०१८ च्या खरीप हंगामासाठी ४ रुपये अनुदान मिळाले आहे. पिंगळे यांची एक एकर शेती असून सुरुवातीला लावलेल्या ऊसानंतर तूर देखील जळून गेली होती. तलाठ्याने सर्व पिकांचा पंचनामा देखील केला होता.

दरम्यान, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे बहुतांश पिक जळाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे ४ रुपये अनुदान देऊन सरकार थट्टा करत असल्याची भावना पंडित इंगळे यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!