मुंबई: राज्यात आज एकूण ५ कोटी नागरिकांनी लसीकरण केले आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग राज्यात वाढत असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. दरम्यान राज्यात आतापर्यंत ५ कोटी नागरिकांनी लसीचा डोस घेतला आहे.
लसीकरणाचा वेग वाढतो आहे. तसेच कोरोना संक्रमणाचा वेगही कमी होताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांतील बंधने शिथिल केली आहेत. १५ ऑगस्टपासून व्यापाऱ्यांना १० वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास परवानगी मिळालेली आहे. तर राज्यातील कोरोना संक्रमणाचा प्रभाव जिथे कमी असेल त्याठिकाणी शाळा उघडण्याचे संकेतही राज्य शासनाने दिले आहेत.
महाराष्ट्राने आज ५ कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे.
Maharashtra crosses the mark of administering 5 crore vaccination doses.#BreakTheChain
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 17, 2021
दरम्यान राज्यात गेली २४ तासात ४,१४५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ६१ लाख ९५ हजार ७४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६ टक्के आहे. त्यात लसीकरणाचा वेगही अधिक असल्याने राज्यात कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची होणार आज घोषणा
- अफगाणिस्तानच्या प्रसिध्द निर्मातीने मागितले मदतीचे आवाहन
- लॉर्ड्सवर कोहलीचा मोठा विक्रम, वेस्ट इंडिजच्या महान कर्णधाराला टाकले मागे
- केएल राहुलने संपवला 44 वर्षांचा दुष्काळ, अशी कामगिरी करणारे गावस्कर होते पहिले भारतीय सलामीवीर
- ‘जिम-मॉल सुरु झाले, सिनेमांना इतर पर्याय मिळाले…मात्र नाट्यभूमीचं काय ?’


