Share

तेलगावातील ट्रॉमा केअर सेंटर तातडीने सुरु करा, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करणार – जिल्हाधिकारी रवींद्र जगताप

Published On: 

बीड: जिल्ह्यात कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या वाढतच असून त्यामुळे आता रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाहीये. नवीन रुग्ण भारती करायचं म्हणलं तर खाटा उपलब्ध नाहीयेत तसेच अनेक वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अशात तेलगाव येथील ट्रॉमा केअर सेंटर तातडीने सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. नवीन रुग्णांसाठी तिथे सोय करता येईल त्या उद्देशाने तेलगाव येथील ट्रॉमा केअर सेंटर तातडीने सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना सुविधा देण्यासाठी तातडीने तेलगाव (ता. वडवणी) येथील ट्रॉमा केअर सेंटरची दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. तसेच जर हे तातडीने सुरू नाही झाले तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

तेलगाव येथील ट्रॉमा केअर सेंटर सध्या नादुरुस्त आहे. जेणेकरून कोविड-१९ च्या रुग्णांना त्याठिकाणी उपचाराकरिता सुविधा उपलब्ध करून देता येईल. याकरिता पुढील २४ तासांत या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून तसा अहवाल तत्काळ सादर करावे, असे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता डी. एस. थूल, व इतर अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी जगताप यांनी आदेश दिले आहेत. या प्रकरणी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा आपणास जबाबदार धरून आपणाविरुद्ध भादंवि १८६० कलम १८८ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथरोग नियम कायदा १८९७ च्या तरतुदीप्रमाणे फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!