औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास (घाटी) वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी ५० लाखांचा आमदार निधी देण्याचे जाहीर केले आहे. गुरुवारी (दि.२९) त्यांनी घाटीस भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी कोणकोणत्या उपकरणांची आवश्यकता आहे. याचा आढावा त्यांनी घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ.सतीश चव्हाण यांनी गुरुवारी (दि. २९) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास (घाटी) भेट दिली. घाटीतील सर्व विभाग प्रमुखांशी त्यांनी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, विशेष कार्यकारी अधिकारी आदींची उपस्थिती होती. रूग्णांवर उपचार करताना कोण कोणत्या अडचणी येतात, उपचारासाठी कोणकोणती उपकरणे उपलब्ध आहेत, कोणकोणत्या उपकरणांची आवश्यकता आहे, मनुष्यबळाची सद्य परिस्थिती कशी आहे आदींचा आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी आढावा घेतला.
घाटीत कोविडची गंभीर असलेली रूग्ण मोठ्या प्रमाणावर भरती होत आहेत. या रूग्णांकरिता विविध यंत्रसामुग्री व इतर उपकरणे यांची आवश्यकता असते. मात्र सध्या घाटीत उपलब्ध असलेली यंत्रसामुग्री व इतर उपकरणे हे रूग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे उपचाराकरिता कमी पडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तसेच जिल्हापातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कार्यवाहीला बळ देण्यासाठी राज्य शासनाने १६ एप्रिल २०२१ रोजी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना प्रत्येकी १ कोटी रू. निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. घाटीत सद्यस्थितीत वैद्यकीय यंत्रसामुग्री कमी पडत असल्याने यातील ५० निधी घाटी प्रशासनाला देणार असल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी बैठकीत सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- बीडमध्ये १४७० नवे बाधित; गुरुवारच्या आकड्यांनी चिंतेत भर
- उस्मानाबादेत चाैदा दुकानांना सील, व्यापाऱ्यांमध्ये खळबळ
- मोठी बातमी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे यांचा राजीनामा
- बीडमध्ये कोरोनाची दहशत; नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी
- ‘आमचं ठरलंय’ नंतर कोल्हापुरात आता ‘गोकुळ चांगलच चाललंय’ पॅटर्नची चर्चा !

